सूरज यादव
खाद्यपदार्थांवर लिहिलेल्या सूचनांमुळे अनेकदा त्याच्या गुणवत्ता, एक्सपायरी डेट याबाबत संभ्रम निर्माण होतो. बऱ्याचदा एक्स्पायरी डेट ऐवजी Use By किंवा Best Before असं लिहिलेलं असतं.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
अनेक लोक विकत आणलेले खाद्यपदार्थ त्यावर असलेली सुचना चुकीची वाचतात आणि पदार्थ लगेच फेकून देतात किंवा खूप उशिरा खातात. जर योग्य अर्थ समजला तर आरोग्यासाठी सुरक्षित ठरेल.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
Best Before लिहिलेल्या खाद्यपदार्थाची दिलेल्या तारखेपर्यंत गुणवत्ता चांगली असते. त्या तारखेनंतर मात्र पदार्थाची गुणवत्ता, चव यात फरक पडू शकतो.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
Best Before तारखेनंतर...
ज्या खाद्यपदार्थांवर Best Before लिहिलंय ते पदार्थ दिलेल्या तारखेनंतर खाणं धोक्याचं नाही. पण त्याची चव बिघडलेली असू शकते. Best Beforeचा संबंध फक्त पदार्थाच्या गुणवत्तेशी आहे.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
Use By असं लेबल खाद्यपदार्थांवर असेल तर त्या तारखेनंतर खाणं धोक्याचं ठरू शकतं. Use by तारखेनंतर पदार्थाची चव, रंग चांगला दिसेल पण त्यात बॅक्टेरियांची वाढ झालेली असू शकते.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
Use By लेबल असणारे खाद्यपदार्थ तारखेनंतर खाणं टाळलं पाहिजे. यात बहुतांश डेअरी उत्पादने, मटण किंवा तयार जेवण यांचा समावेश असतो. ठराविक वेळेनंतर हे पदार्थ खराब होतात.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
विकत घेतलेला खाद्यपदार्थ कसा दिसतो? त्याचा रंग कसा आहे? त्याचा गंध नेहमीसारखा आहे की वेगळा येतोय यावरून त्याची गुणवत्ता ओळखू शकता. फक्त तारखेवर विश्वास ठेवू नका.
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal
विकत आणलेल्या खाद्यपदार्थांवर लावलेले लेबल्स चेक करा. त्यावर असलेली तारीख कशाबद्दल आहे? किती तापमानात स्टोअर करावं हे काळजीपूर्वक वाचा
Best Before and Use By Meaning Learn the Real Difference Before You Throw Food Away
Esakal