Shubham Banubakode
MI च्या अश्वनी कुमारने KKR विरुद्धच्या सामन्यात ४ विकेट घेत सर्वांनाच थक्क केलं आहे.
आयपीएल पदार्पणात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
मात्र, पदार्पणात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्वनी कुमार हा पहिला खेळाडू नाही.
यापूर्वी काही खेळाडूंनी अशाप्रकारची कामगिरी केली आहे. यात एका पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश आहे.
यापूर्वी अल्झारी जोसेफने २०१९ मध्ये एसआरएच विरुद्धच्या सामन्यात १२ धावा देत ६ विकेट घेतल्या.
अँड्र्यू टायने २०१७ मध्ये आरपीएसविरुद्धच्या सामन्यात १७ धावा देत ५ विकेट घेतल्या.
शोएब अख्तरने २००८ मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ११ धावा देत ४ विकेट घेतल्या.
केव्हॉन कूपरने २०१२ मध्ये केएक्सआयपी विरुद्धच्या सामन्यात २६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
डेव्हिड वाईस २०१५ ने मुंबई विरुद्धच्या सामन्यात ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.