Monika Shinde
१२ वी नंतर कोर्स निवडताना तुमच्या आवडी, कौशल्ये आणि भविष्यात काय करायचं आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे पुढे जाऊन समाधान मिळेल.
इंजिनिअरिंग, एमबीबीएस, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, किंवा पर्यावरण शास्त्र यांसारखे चांगल्या संधी मिळवून देणारे आणि लोकप्रिय कोर्सेस उपलब्ध आहेत.
फायनान्स, व्यवस्थापन किंवा व्यवसाय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी बीकॉम, बीबीए, सीए किंवा इंटिग्रेटेड एमबीए यासारखे कोर्सेस चांगले पर्याय ठरू शकतात.
कायदा, ह्युमॅनिटीज, मानसशास्त्र किंवा मास कम्युनिकेशन यासारखे कोर्सेस हे त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निवडण्यासारखे चांगले पर्याय आहेत.
डेटा सायन्स, सायबरसिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांचा वेगाने विकास होत आहे आणि येथे भरपूर नोकऱ्यांच्या तसेच चांगल्या कमाईच्या संधी आहेत.
फॅशन डिझाईन, इंटिरिअर डिझाईन, तसेच ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत.
तुमच्या आवडी, क्षमता, कॉलेजची प्रतिष्ठा आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच करिअर सल्लागारांचा सल्ला घेऊन आणि स्वतःची प्रामाणिकपणे समीक्षा केल्याने १२ वी नंतरचा निर्णय अधिक सोपा आणि योग्य होतो.