Monika Shinde
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साइप्रस या देशाच्या दोन दिवसांच्या भेटीवर आहेत. या दौऱ्यात त्यांना साइप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला आहे. चला पाहूया, या छोट्या देशाबद्दल काही अनोख्या गोष्टी.
सायप्रसमध्ये मानववस्तीची सुरुवात १०,००० वर्षांपूर्वी झाली होती. हे जगातील सर्वात प्राचीन मानवी वास्तव्यांपैकी एक मानले जाते.
या देशात ‘साइप्रस कॅट’ नावाची खास मांजर आढळते, जी या प्रदेशाशी खास जोडलेली आहे.
तांब्याचा लॅटिन शब्द ‘Cuprum’ या देशाच्या नावावरून आला आहे कारण प्राचीन काळात इथे तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे.
दरवर्षी सायप्रसमध्ये सुमारे ३०० दिवस उन्हाळा असतो, त्यामुळे तो युरोपमधील सर्वाधिक उजेड असलेला प्रदेश आहे.
या देशात दोन अधिकृत भाषा ग्रीक आणि तुर्की वापरल्या जातात, ज्यामुळे त्याचा इतिहास आणि संस्कृती वेगळी आहे.
येथे लोक वाईट नजरेपासून बचावासाठी ताबीज आणि शुभचिन्हे वापरतात.
साइप्रसची ‘कोमांडेरिया’ वाइन २००० वर्षांहूनही जास्त काळापासून बनवली जात आहे आणि ती जगातील सर्वात जुनी वाइन मानली जाते.
साइप्रसचे किनारे युरोपातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मानले जातात, ज्यांना वारंवार ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कारही मिळाला आहे.