Monika Shinde
बारावीनंतर अनेक विद्यार्थी कला शाखेत आपले करिअर बनवतात. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल आणि भविष्यातील करिअर पर्याय शोधत असाल, तर चला जाणून घ्या कला विद्यार्थ्यांसाठी कोणते कोर्सेस उत्तम आहेत.
बीए कोर्समध्ये तुम्ही इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतर विषयांची निवड करू शकता. हा कोर्स तुमच्यासाठी अनेक विविध क्षेत्रांमध्ये करिअर साधण्याची संधी देतो.
जर तुम्हाला पेंटिंग, शिल्पकला, डिजिटल आर्ट्स, नृत्य किंवा गाण्यांमध्ये आवड असेल, तर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा उत्तम कोर्स आहे. या कोर्समध्ये तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो.
जर तुम्हाला व्यवसाय व्यवस्थापनामध्ये आवड असेल, तर BBA हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट आणि नेतृत्वाचे महत्त्व शिकता येते.
मीडिया, पत्रकारिता आणि संचार क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स योग्य आहे. यामध्ये तुम्ही न्यूज रिपोर्टिंग, लेखन, सोशल मीडिया आणि इतर मीडिया क्षेत्रे एक्सप्लोर करू शकता.
जर तुम्हाला कायदा आणि न्यायव्यवस्थेमध्ये आवड असेल, तर LLB हा एक उत्तम कोर्स आहे. यामध्ये तुम्ही वकील, न्यायाधीश किंवा कायद्याशी संबंधित इतर करिअर करू शकता.