Monika Shinde
उन्हाळा आला की, शरीरात पाणी कमतरता होऊ लागते, आणि आपल्याला अधिक हायड्रेटेड राहण्यासाठी ताजे आणि शुद्ध पाणी पिणे आवश्यक असते.
यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी तांब्याच्या आणि मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे पाहूया.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
मातीच्या भांड्यात पाणी पिण्यामुळे पाणी ताजं आणि चवदार लागते. माती उष्णतेला शोषून घेतल्याने पाणी थंड राहते, जे उन्हाळ्यात अत्यंत आरामदायक ठरते.
तांब्याचे आणि मातीचे भांडे पाणी पिण्यामुळे शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळते, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचा हायड्रेटेड राहते.