Anushka Tapshalkar
कुत्र्याला सर्वात प्रामाणिक प्राणी मानले जाते. माणसाचा जिवलग मित्र असलेल्या या प्राण्याच्या अनेक जाती असतात. त्यातल्या काही अत्यंत हुशार असतात तर काहींना नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागतो.
या जाती त्यांची बुद्धिमत्ता, उत्साह आणि प्रशिक्षणात सहजतेने जुळवून घेण्याची क्षमता यासाठी ओळखले जातात.
चला तर मग या सर्वांत बुद्धिमान जातींबद्दल जाणून घेऊया!
बॉर्डर कॉल्लीला सर्वांत बुद्धिमान जाती म्हणून ओळखले जाते. ते चपळता आणि आज्ञा पाळण्यात उत्कृष्ट आहेत. त्यांची काम करण्याची आणि शिकण्याची उत्सुकता त्यांना डॉग स्पोर्ट्ससाठी उत्तम जात ठरवते.
पुडल केवळ सुंदर दिसत नाहीत, तर ते अत्यंत हुशार देखील असतात. कोणतेही प्रशिक्षण; सोप्यापासून ते अवघड अन किचकट पद्धती सुद्धा ते सहजतेने आत्मसात करतात.
गोल्डन रिट्रिव्हर केवळ मैत्रीपूर्णच नाहीत, तर पटकन शिकणारी जात आहेत. त्यांची बुद्धिमत्ता आणि सौम्य स्वभाव त्यांना उत्कृष्ट थेरपी डॉग्स बनवतो आणि कुटुंबांसाठी आदर्श सोबतीही बनवतो.
डोबर्मन अत्यंत बुद्धिमान असून सातत्यपुर्ण प्रशिक्षणाला चांगले प्रतिसाद देतात. त्यांची निष्ठा आणि सतर्कता त्यांना उत्कृष्ट रक्षक कुत्रे व सोबती बनवते.
जर्मन शेफर्ड एकनिष्ठ आणि सक्रीय कामाच्या नैतिकतेसह सक्रिय जाती आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
लॅब्स केवळ प्रेमळच नाहीत तर लवकर शिकणारेही असतात. त्यांची आनंदी आणि उत्साही प्रवृत्ती त्यांना प्रशिक्षणासाठी परिपूर्ण बनवते, मग ते कामासाठी असो, खेळासाठी किंवा सहाय्यक भूमिकांसाठी.