Anushka Tapshalkar
जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान 15 मिनिटे स्वच्छ धुवा. यामुळे विषाणूंचा धोका कमी होतो.
जखमेवर आयोडीन किंवा 70% अल्कोहोल लावा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
जखम शक्यतो कोरडी ठेवा किंवा हलक्या निर्जंतुक पट्टीने (Sterile Gauze Pads) झाका. परंतु जखम शक्यतो उघडीच ठेवावी असा डॉक्टर सल्ला देतात.
कुत्रा ओळखीचा असल्यास त्यामध्ये रेबीजची लक्षणे आहेत का, याचे निरीक्षण करा – जसे की चिडचिड, पाळी न लागणे, लाळ येणे इ.
कुत्रा ओळखीचा असो वा अनोळखी, डॉक्टरांकडे तातडीने जा. ते लसीकरणाची गरज तपासतील.
जर चावलेला कुत्रा भटक्या स्वरूपाचा असेल किंवा रेबीजची शंका असेल, तर रेबीजची लस घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.
आपल्या टीटॅनस लसीकरणाचा शेवटचा डोस केव्हा झाला, हे तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असल्यास डोस घ्या.
भटका किंवा आक्रमक कुत्रा असल्यास स्थानिक पालिका किंवा प्राणी नियंत्रण विभागाला याची माहिती द्या.