पुजा बोनकिले
१६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जात आहे.
डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का डेंग्यू झाल्यास कोणते पदार्थ खावे. चला तर मग पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.
डेंग्यू झाल्यास नारळ पाणी प्यावे.
फळांचा रस प्यावा. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यास मदत मिळते. दररोज २-३ चमचे पपईच्या पानांचा रस प्या किंवा ताजी पपई खा.
खिचडी, सुप यासारखे पचायला हलके असलेले पदार्थ खावे.
संत्री, किवी आणि आवळा यांसारखी फळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला विषाणूंशी लढण्याची ताकद देतात, त्यांचा आहारात समावेश करा.