पुजा बोनकिले
यंदा १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जात आहे.
डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
अनेक वेळा डेंग्यूची लक्षणे तापासारखीच असतात. यामुळे सामान्य ताप वाटतो. पण डेंग्यू झाल्यास सुरूवातीला कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
डेंग्यू झाल्यास अचानक डोकेदुखी वाढू शकते.
अचानक तीव्र ताप येणे.
स्नायू आणि सांधेदुखीमुळे हालचाल करणे कठीण होऊ शकते.
शरीरावर लाल पुरळ येणे, जी सुरुवातीला सपाट आणि लाल दिसतात.
वारंवार उलट्या आणि मळमळ येणे हे सुरुवातील लक्षण दिसते.
डोळ्यांमधुन आणि हिरड्यांमधुन रक्तस्त्राव होणे हे लक्षण दिसू शकते.