पोट साफ होत नाहीये? 'या' 3 फळांचे करा सेवन; बद्धकोष्ठता होईल कायमची दूर!

Aarti Badade

बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतोय?

फायबरची कमतरता आणि पाण्याच्या अभावामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. गॅस, अपचन आणि पोट जड होणे यावर आता औषधांऐवजी घरगुती फळांचा वापर करा.

Constipation relief fruits

|

Sakal

किवी- नैसर्गिक उपाय

किवीमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. दररोज एक ते दोन किवी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया सुलभ होते.

Constipation relief fruits

|

sakal

किवीचे इतर फायदे

किवी केवळ बद्धकोष्ठता दूर करत नाही, तर यात असलेले व्हिटॅमिन सी तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासही मदत करते.

Constipation relief fruits

|

Sakal

भिजवलेले मनुके

मनुक्यांमध्ये 'सॉर्बिटॉल' आणि फायबर असते, जे नैसर्गिक रेचक म्हणून काम करते. दररोज ३ ते ४ भिजवलेले मनुके खाल्ल्याने कडक झालेला मल मऊ होतो आणि शौचास साफ होते.

Constipation relief fruits

|

Sakal

नासपती - पोट साफ करण्यासाठी उत्तम

नासपतीमध्ये 'पेक्टिन' नावाचे फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. नाश्त्यानंतर नासपती खाल्ल्याने आतडे स्वच्छ होतात आणि पोट हलके वाटते.

Constipation relief fruits

|

sakal

वजनही राहते नियंत्रणात

नासपती केवळ पचन सुधारत नाही, तर त्यातील पोषक घटकांमुळे वजन कमी करण्यासही मदत होते. बद्धकोष्ठतेचा जुनाट त्रास असलेल्यांसाठी हे फळ उत्तम आहे.

Constipation relief fruits

|

sakal

आजपासूनच करा बदल!

औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा ही नैसर्गिक फळे तुमच्या आहारात सामील करा. भरपूर पाणी प्या आणि वेळेवर जेवणाची सवय लावा. आराम नक्की मिळेल!

Constipation relief fruits

|

Sakal

खराब कोलेस्ट्रॉल साचलंय? ‘हे’ ३ सुपरफूड्स करतील स्वच्छता; हृदय राहील फिट!

Bad cholesterol treatment

|

Sakal

येथे क्लिक करा