खराब कोलेस्ट्रॉल साचलंय? ‘हे’ ३ सुपरफूड्स करतील स्वच्छता; हृदय राहील फिट!

Aarti Badade

हृदयविकाराचा वाढता धोका

अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुण वयातही हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील वाढलेले 'खराब कोलेस्ट्रॉल' (LDL).

Bad cholesterol treatment

|

Sakal

काय होतं जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं?

वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर तयार करते. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येतात, अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Bad cholesterol treatment

|

Sakal

राजमा - फायबरचा खजिना

राजमामध्ये भरपूर फायबर असते. हे फायबर आतड्यांमध्ये जाऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते.

Bad cholesterol treatment

|

Sakal

हिरवे मटार - नसांची स्वच्छता

थंडीच्या दिवसात मिळणारे हिरवे मटार व्हिटॅमिन के आणि फायबरने समृद्ध असतात. यातील फायटोन्यूट्रिएंट्स रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी विरघळवण्यास मदत करतात.

Bad cholesterol treatment

|

sakal

मसूर डाळ - कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

मसूर डाळ फायबर आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी मसूर डाळ नक्की खावी.

Bad cholesterol treatment

|

Sakal

रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

या डाळींच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावर येणारा ताण कमी होतो.

Bad cholesterol treatment

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे; अधिक माहितीसाठी किंवा गंभीर समस्येसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Bad cholesterol treatment

|

Sakal

'सुरमई' मासा खाणे 'या' लोकांसाठी ठरू शकते घातक!

Surmai Fish Side Effects

|

Sakal

येथे क्लिक करा