Saisimran Ghashi
केस गळणे, केसात कोंडा होणे यांसारख्या अनेक समस्या हल्ली खूप जास्त वाढल्या आहेत.
पण बुलढाणा जिल्ह्यातील शेगावजवळील गावांमध्ये सध्या टक्कल व्हायरसची चर्चा सुरू आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि विशेष म्हणजे स्त्रियांमध्ये केस गळून टक्कल पाडण्याचे प्रमाण वाढले आहे.
डोक्यात खाज येऊन तीन दिवसांत टक्कल पडते असा हा व्हायरस आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
केसांच्या अनेक समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक तेल वापरले पाहिजे.
खोबरेल तेलासह मेथी दाणे, रोजमेरी आणि कांद्याचे तेल देखील केस गळतीवर प्रभावी ठरते.
कोरफड आणि कडूलिंबाच्या पाल्याची पावडर केसांना लावू शकता ज्याने कोंडा कमी होतो.
आवळ्याचे तेल देखील केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.