बाल्कनीतही लावता येतील अशी औषधी झाडं कोणती?

Pranali Kodre

औषधी झाडे (Medicinal Plants)

दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आणि बाल्कनीत सहज वाढणारी अनेक औषधी झाडे आहेत.

Balcony Medicinal Plants

|

Sakal

कुंडीतही वाढतात औषधी झाडे

योग्य सूर्यप्रकाश, चांगला पाण्याचा निचरा, चांगली माती आणि नियमित व पुरेसं पाणी दिल्यास अशी झाडं कुंडीतही उत्तम वाढतात.

Balcony Medicinal Plants

|

Sakal

तुळस (Basil)

भारतातील जवळपास प्रत्येक घरात तुलस असतेच. सर्दी, खोकला, आणि श्वसनाच्या त्रासावर तुळस गुणकारी आहे.

Tulsi

|

Sakal

कोरफड (Aloe Vera)

कोरफड अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे. विशेषत: त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी. तसेच त्याचं जेल भाजलेल्या त्वचेवर लावता येते.

Aloe Vera

|

Sakal

पुदिना (Mint)

पचनक्रिया सुधारण्यासाठी पुदिना फायदेशीर आहे. कुंडीत वेगाने पुदिना पसरतो.

Mint

|

Sakal

ओवा (Ajwain)

लहान कुंडीतही वाढणारा ओवा अपचन आणि पोटदुखीसाठी उपयुक्त आहे.

Ajwain

|

Sakal

कढीपत्ता (Curry Leaves)

केस आणि पचनासाठी फायदेशीर असलेला कढीपत्त्याचा भारतीय स्वयंपाक घरात नियमित वापरला जातो. पण कढीपत्त्यासाठी थोडी मोठी कुंडी असेल, तर उत्तम.

Curry Leaves

|

Sakal

गवती चहा (Lemongrass)

सर्दी-खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखीवर यावर गवती चहाचा काढा गुणकारी ठरतो. मोठ्या कुंडीत गवती चहा छान वाढतो.

Lemongrass

|

Sakal

अडुळसा (Adulsa)

आयुर्वेदिक औषधांमध्ये खोकल्यासाठी अडुळसा मुख्य घटक आहे. याची पानं उकळुन प्यायलाचा फायदा होतो. याला मध्यम आकाराची किंवा मोठी कुंडी चालते.

Adulsa

|

Sakal

विड्याची वेल/नागवेली (Betel Leaf)

पचनक्रिया सुधारण्यासाठी, श्वासातील दुर्गंधी कमी करण्यासाठी, सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी विड्याच्या पानांचा उपयोग होतो. ही वेल असून याला वाढण्यासाठी कशाचातरी आधार लागतो.

Betel Leaf

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

दरम्यान, या औषधी वनस्पतींचे सेवन करताना डॉक्टरांचाही सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Balcony Medicinal Plants

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Tulsi

|

Sakal

घराला रॉयल लूक देणारी ५ झाडं

Indoor Plants for Royal Look

|

Sakal

येथे क्लिक करा