Anushka Tapshalkar
फक्त उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही आपली त्वचा काळी किंवा टॅन पडते.
हे टॅनिंग आपण घरच्या घरीच दूर करू शकतो. पुढे असेच काही घरगुती उपाय दिले आहेत जे तुमचं सण टॅनिंग लगेच कमी करतील.
बटाट्यामधील नैसर्गिक एंजाइम्स टॅनिंग कमी करतात. बटाटा किसून त्याचा रस टॅन झालेल्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांनी स्वच्छ धुवा.
काकडी त्वचेला थंडावा देते आणि टॅनिंग कमी करते. काकडीचा रस काढून टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा.
लिंबामधील सिट्रिक अॅसिड टॅनिंग कमी करण्यात मदत करते. ताज्या लिंबाचा रस टॅन झालेल्या भागावर लावा. 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
टोमॅटो नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतो, तर दही त्वचेला पोषण देते. दोन चमचे टोमॅटोचा रस आणि एक चमचा दही मिसळा. मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.
बेसन त्वचा स्वच्छ करते , तर हळद त्वचेची चमक वाढवते. दोन चमचे बेसन, एक चमचा हळद आणि थोडेसे दूध मिसळा. हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावा आणि वाळल्यानंतर धुवा.
पपईमध्ये पापेन एंजाइम असते, जे टॅनिंग दूर करण्यास मदत करते. पिकलेल्या पपईचा लगदा तयार करून त्वचेवर लावा. 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.