पालकपेक्षाही जास्त लोह असतं 'या' पदार्थांमध्ये! हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी तर बेस्ट

Anushka Tapshalkar

हळीव

हळीवाच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. या बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी लिंबाच्या रसासोबत घेऊ शकता. तसेच हळीवाचे लाडूही आहारात समाविष्ट करू शकता.

Halim

|

sakal

तीळ

१०० ग्रॅम तिळामध्ये साधारण १४.६ मिग्रॅ लोह असू शकते. विशेषतः काळ्या तिळाचा आहारात समावेश करा. लोहाचे शोषण चांगले होण्यासाठी तिळासोबत लिंबू किंवा व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खा.

Sesame Seeds

|

sakal

कुळीथ

कुळीथ ही लोहयुक्त कडधान्यांपैकी एक आहे. १०० ग्रॅम कच्च्या कुळथामध्ये साधारण ७ मिग्रॅ लोह असू शकते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कुळथाची आमटी किंवा डाळ आहारात समाविष्ट करू शकता.

Kulith

|

sakal

राजगिरा

राजगिर्‍याच्या पालेभाजीमध्ये १०० ग्रॅममागे साधारण ३.९ मिग्रॅ लोह असू शकते. या भाजीवर लिंबाचा रस पिळा किंवा टोमॅटो घालून भाजी बनवा. यामुळे वनस्पतीजन्य लोहाचे शोषण वाढण्यास मदत होते.

Rajgira

|

sakal

शेवगा

शेवग्याची पाने वनस्पतीजन्य लोहाचा चांगला स्रोत आहेत. ताज्या पानांमध्ये १०० ग्रॅममागे साधारण ४ मिग्रॅ लोह असू शकते. शेवग्याच्या पानांची भाजी किंवा डाळीत शेवग्याच्या पानांची पावडर घालून त्यांचा आहारात समावेश करू शकता.

Moringa Leaves

|

sakal

अंजीर

सुके अंजीर हे लोहासह इतर पोषक घटकही देतात. १०० ग्रॅम सुक्या अंजीरामध्ये साधारण ३.२ मिग्रॅ लोह असू शकते. सकाळी दोन भिजवलेले अंजीर खाऊ शकता. मात्र, त्यात नैसर्गिक साखर असल्याने प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

Fig

|

sakal

मखाणा

मखाण्यामध्ये १०० ग्रॅममागे साधारण ३.६ मिग्रॅ लोह असू शकते. मखाणे तुपात भाजून पौष्टिक स्नॅक म्हणून खाऊ शकता. त्यासोबत व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ घेतल्यास वनस्पतीजन्य लोहाचे शोषण वाढण्यास मदत होते.

Makhana

|

sakal

महत्त्वाची टीप

पालकामध्ये लोह असले तरी ऑक्सलेटमुळे त्याचे शोषण कमी होऊ शकते. लोहाच्या कमतरतेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

सलग ३० दिवस वाफवलेला आवळा खाल्ल्यास शरीरात होतात 'हे' बदल!

Steamed Aamla Benefits

|

sakal

आणखी वाचा