नाशिकजवळील निसर्गासोबत इतिहासाचा अनुभव देणारी 'ही' ठिकाणे नक्की पाहा!

Aarti Badade

नाशिकमध्ये इतिहासाची सफर

नाशिक हे धार्मिक महत्त्वासोबतच प्राचीन इतिहास आणि वास्तूवैभवासाठीही प्रसिद्ध आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

Nashik tourist places

|

Sakal

पांडव लेणी

नाशिकजवळील त्रिरश्मी टेकड्यांमध्ये असलेली पांडव लेणी म्हणजेच त्रिरश्मी लेणी हा प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे. खडकात कोरलेल्या या लेण्यांमधून तत्कालीन स्थापत्यकलेची झलक पाहायला मिळते.

Nashik tourist places

|

Sakal

त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग येथे असल्याने देशभरातून भाविक येथे येतात. पावसाळ्यात मंदिराभोवतालचा निसर्गही विशेष खुलून दिसतो.

Nashik tourist places

|

Sakal

चामर लेणी

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील चामर लेणी किंवा गजपंथ लेणी इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. टेकडीवर असलेल्या या जैन लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या चढाव्या लागतात.

Nashik tourist places

|

Sakal

शिल्पकलेचा अनोखा ठेवा

चामर लेणी परिसरात प्राचीन जैन शिल्पे आणि कोरीवकाम पाहायला मिळते. तुलनेने शांत वातावरणामुळे गर्दीपासून दूर इतिहास अनुभवण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करू शकते.

Nashik tourist places

|

Sakal

रामशेज किल्ला

नाशिकजवळील डोंगरावर वसलेला रामशेज किल्ला इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. किल्ल्यावर जुन्या तटबंदीचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्यांसारख्या ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात.

Nashik tourist places

|

Sakal

कावनई किल्ला

इगतपुरी तालुक्याच्या परिसरातील कावनई किल्ला शांत वातावरणासाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या आसपासचा धार्मिक स्थळे पाहता येतात.

Nashik tourist places

|

Sakal

इतिहास + हिरवाईचा अनुभव!

पावसाळ्यात परिसरातील डोंगररांगा हिरव्यागार होतात. त्यामुळे किल्ले, लेणी आणि प्राचीन वास्तूंसोबत निसर्गरम्य आनंद घेता येतो. मात्र सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Nashik tourist places

|

Sakal

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘ही’ नैसर्गिक नाईट क्रीम

Night Cream With Butterfly Pea

|

Sakal

येथे क्लिक करा