Anushka Tapshalkar
आजकालच्या रासायनिक उत्पादनांमुळे, धूळ आणि इतर कारणांमुळे केसांची काळजी घेणे आव्हानात्मक झाले आहे. तेल, हेअर मास्क्स यासोबतच सीरमही केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. खाली काही सीरम दिले आहेत, जे केसांची निगा राखण्यास मदत करतात.
Hair Care
sakal
नारळ तेल, अलोहेरा जेल आणि रोजमेरी तेलाचे काही थेंब एकत्र करून एक सीरम तयार करा. आठवड्यातून तीन वेळा ओल्या केसांवर लावा; यामुळे केसांना खोलवर ओलावा मिळेल आणि नैसर्गिक चमक येईल.
Aloe Vera and Coconut Oil Serum
sakal
ग्रीन टी थंड करून त्यात अलोहेरा जेल आणि मध मिसळा. शॅम्पू केल्यानंतर आठवड्यातून २-३ वेळा लावा; यामुळे केसांना हायड्रेशन आणि ताजेपणा मिळतो.
Green Tea-Aloe Vera Serum
sakal
पिकलेले ऍव्होकॅडो मॅश करून त्यात बदाम तेल आणि काही थेंब लॅव्हेंडर तेल घाला. ओल्या केसांवर लावून २० मिनिटांनी धुवा; केस मऊ आणि पोषणयुक्त होतील.
Avocado-Almond Oil Serum
sakal
गुलाबपाणी, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई एकत्र करून एक सीरम तयार करा. रोज हलक्या हातांनी ५-१० मिनिटे मसाज केल्याने टाळूला पोषण मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते.
Rose Water- Glicerin Serum
sakal
ताज्या जास्वंद फुलांना ऑलिव्ह तेलात मिसळून नैसर्गिक सीरम बनवा. शॅम्पू करण्यापूर्वी ओल्या केसांवर ३० मिनिटांसाठी लावल्यास केस अधिक मऊ आणि चमकदार होतात.
Hibiscus-Oilive Oil Serum
sakal
सीरम नेहमी स्वच्छ आणि थोडे ओले केसांवर लावा; यामुळे पोषण सहजपणे शोषले जाते.
Keep in Mind
sakal
या घरगुती सीरमचा नियमित वापर केल्यास केस गळणे कमी होते आणि केसांच्या मुळांना मजबुती मिळते.
Continous Use of Natural Serum
sakal
Hair Care
sakal