Pranali Kodre
ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी आकाराने लहान झाडं सर्वोत्तम मानली जातात.
Office Desk Plants
Sakal
तसेच जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसणारी आणि कमी पाण्यात जगणारी झाडं ऑफिस डेस्कसाठी फायदेशीर ठरतात.
Office Desk Plants
Sakal
एकाग्रता वाढवण्यास मदत करणारे पीस लिली आहे. मनाला शांतताही देणारे हे फुलझाड असून याला पांढरी फुलं येतात.
Office Desk Plants
Sakal
लहान काचेच्या बाऊलमध्ये थोडे पाणी आणि दगड ठेवून लकी बांबूचे झाड टेबलवर ठेवता येते. फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार हे झाड सुख, समृद्धी आणि यश देते.
Office Desk Plants
Sakal
सुक्युलंट (Succulent) प्रकारातील जेड प्लांट कमी जागेत वाढते.
Office Desk Plants
Sakal
कमी देखभाल लागणारे स्नेक प्लांट २४ तास ऑक्सिजन सोडते, त्यामुळे आजूबाजूला हवा शुद्ध राहण्यास मदत होते.
Office Desk Plants
Sakal
गडद हिरवी आणि चमकदार पानं असलेल्या झीझी प्लांटने डेस्कला एक मॉडर्न आणि कॉर्पोरेट लुक मिळतो.
Office Desk Plants
Sakal
पाण्यात किंवा मातीच्या लहान कुंडीतही मनी प्लांट लावता येते, पण टेबलसाठी नियमित छाटून लहान आकारात ठेवावं लागतं.
Office Desk Plants
Sakal
स्पायडर प्लांटला खूप कमी देखभाल लागते. ते देखील ऑफिस डेस्कसाठी उत्तम झाड आहे.
Office Desk Plants
Sakal
एअर प्लांटसाठी मातीची अजिबात गरज नाही.ही झाडे हवेतील ओलावा आणि पोषक घटक शोषतात. एखाद्या काचेच्या टेरारियममध्ये (Glass Globe), लाकडाच्या तुकड्यावर किंवा स्टायलिश मेटल स्टँडवर हे झाड ठेवता येते.
Office Desk Plants
Sakal
हळूहळू वाढणारे पेपरोमिया बरीच वर्षे आपल्या लहान आकारातच राहते. त्याच्या चमकदार, जाड पानांमुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
Office Desk Plants
Sakal
Balcony Medicinal Plants
Sakal