Pranali Kodre
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. भारताच्या या यशात अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
शुभमन गिलने या मालिकेत सर्वाधिक ७५४ धावा करताना अनेक विक्रम मोडले. त्याने ७५.४०च्या सरासरीने या धावा करताना ४ शकतं झळकावली.
लोकेश राहुल हा या संघातील अनुभवी फलंदाज होता आणि त्याने त्या दर्जाचा खेळ केला. त्याने ५३.२०च्या सरासरीने ५३२ धावा केल्या. त्यात २ शतकं व २ अर्धशतकं आहेत.
रवींद्र जडेजाने लॉर्ड्स व मँचेस्टर कसोटीत दाखवलेली जिद्द कौतुकास्पद होती. त्याने मालिकेत १ शतक व ५ अर्धशतकांसह ५१६ धावा केल्या. शिवाय ७ विकेट्सही घेतल्या.
रिषभ पंतला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असली तरी त्याने चार सामन्यांत ६८.४२ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या. त्यात २ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
यशस्वी जैस्वाल याला नजरअंदाज करून चालणार नाही. त्याने या मालिकेत २ शतकं व २ अर्धशतकांसह ४१ च्या सरासरीने ४११ धावा केल्या.
वॉशिंग्टन सुंदरच्या शतकाकडे अन् करुण नायरच्या पाचव्या कसोटीतील निर्णायक अर्धशतकाला विसरून चालणार नाही. सुंदरने ४ सामन्यातं २८४ धावा, तर नायरने ४ सामन्यांत २०५ धावा केल्या.
गोलंदाजीत मोहम्मद सिराजने एकहाती खिंड लढवली. त्यान मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद ७० धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
जसप्रीत बुमराहने ३ सामन्यांत १४, प्रसिद्ध कृष्णाने ३ सामन्यांत १४ विकेट्स घेऊन भारताच्या प्रवासाह हातभार लावला.
आकाश दीपनेही ३ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या, तर जड्डू व वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी ७ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.