Anushka Tapshalkar
श्रीकृष्णाच्या जन्मभूमीत होळीचा उत्सव वेगळ्याच आनंदात साजरा होतो. येथे होळीची सुरुवात एक आठवडा आधीच होते. बँके बिहारी मंदिरातील 'फुलों की होळी' विशेष प्रसिद्ध आहे.
बरसाण्यात प्रसिद्ध लठमार होळी साजरी केली जाते, जिथे महिलांनी नंदगावच्या पुरुषांना लाठ्यांनी मारण्याची परंपरा आहे, आणि हा उत्सव होळीच्या आठवडाभर आधी सुरू होतो.
इथे होळी सांस्कृतिक पद्धतीने साजरी केली जाते. तसेच होळी हा सण वसंत उत्सव म्हणूनही ओळखला जातो जो रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केला होता.
उदयपूरमध्ये होळी शाही पद्धतीने साजरी केली जाते. सिटी पॅलेसमध्ये होलिका दहन होतं, त्यानंतर पारंपरिक लोकनृत्य आणि मिरवणुका काढल्या जातात.
पुष्करमध्ये होळी उत्साहात साजरी केली जाते, जिथे संगीत, आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि प्रसिद्ध नृत्य महोत्सव यांचे आयोजन होते, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतात.
दक्षिण भारतातील मोजक्या ठिकाणी होळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते, त्यापैकी हम्पी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील प्राचीन मंदिरे आणि अवशेष होळीच्या रंगात न्हालेल्या दिसतात.
राजधानी दिल्लीमध्ये होळीला अनोखी झळाळी असते. येथे रंगलीला कार्यक्रम, स्ट्रीट पार्टी सारखे विविध होळी महोत्सव भरवले जातात. जुनी दिल्लीमध्ये पारंपरिक मिठाई आणि ठंडईसोबत होळीचा आनंद घेता येतो.
गोव्यात शिगमो फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा होळीचा सण पारंपरिक गोवन लोकनृत्य, संगीत आणि रंगांनी भरलेल्या मिरवणुकीसह अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.
होलीचा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर आनंदपूर साहिबमधील होला मोहल्ला हा शीख सण पाहण्यासारखा आहे, जिथे घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्ध कौशल्याचे थरारक प्रदर्शन पराक्रम आणि सांस्कृतिक वारसा दर्शवते.