Pranali Kodre
सध्या उन्हाळ्यात तापमानाने ४० डिग्री सेल्शियस पार केलंय. अशातच सुट्टी असेल आणि फिरण्याचा मूड असेल, तरी इतक्या उन्हात कुठे जावं हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Coorg, Karnataka Travel
Sakal
पण, असं एक ठिकाण आहे, जे उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव देऊ शकतं, ते ठिकाण म्हणजे कुर्ग ( (Coorg or Kodagu).
Coorg, Karnataka Travel
Sakal
कर्नाटक राज्यातील कुर्ग हा प्रदेश भारतातील स्कॉटलंड म्हणूनही ओळखला जातो. येथील तापमान ३० डिग्री सेल्सियसच्या वर फारसं कधी जात नाही.
Coorg, Karnataka Travel
Sakal
समुद्रसपाटीपासून १५२५ मीटर उंचीवर असलेले कुर्ग हे हिलस्टेशन असून कावेरी नदीचे उगमस्थानही आहे.
Coorg, Karnataka Travel
Sakal
कुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफीची शेती होते, याशिवाय मसाल्यांसाठीही कूर्ग प्रसिद्ध आहेत. येथे कॉफीच्या मळ्यांची सफर (Coffee Plantation) देखील करता येते.
Coorg, Karnataka Travel
Sakal
येथील डोंगरात वसलेल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर दुतर्फा असेलेली झाडं मन मोहून टाकतात. केवळ उन्हाळ्यातच नाही, तर पावसाळा आणि हिवाळ्यात तर ढग जमिनीवर आल्याची फिलींग येते.
Coorg, Karnataka Travel
Sakal
कुर्गमध्ये अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत, यात एबी फॉल्स, इरुप्पू फॉल्स या प्रसिद्ध धबधब्यांचा समावेश आहे. (Water falls)
Coorg, Karnataka Travel
Sakal
4050 फूट उंचीवर असलेल्या मंडलपट्टी व्यू पाँइंटवरून दिसणारा नजारा डोळ्यांना सुख देणारा आहे. इथे जाण्यासाठी जीपमधून जावं लागतं.Coorg, Karnataka Travel
Coorg, Karnataka Travel
Sakal
राजा सीट हे एक पार्क असून तिथे लहान मुलांसाठी विविध ऍक्टिव्हिटीही आहेत. याशिवाय येथून दिसणाऱ्या सुर्यास्थासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
Coorg, Karnataka Travel
Sakal
दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये हत्तींसोबत वेळ घालवता येतो, त्यांना अंघोळ घालता येते, तसेच तुम्ही त्यांना खाऊही घालू शकता. मात्र हे ठिकाण सकाळ सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ४.३० ते ५.३० इतकाच वेळ खुले असते. (Dubare Elephant Camp)
Coorg, Karnataka Travel
Sakal
कावेरी नदीने वेढलेलं हे एक बेट असून झुलत्या पुलावरून तेथे जाता येते. येथे बांबूची जंगले असून कावेरी नदीचा खळखळाटही ऐकू येतो. येथेच बर्ड पार्कही असून तिथे विविध पक्षी पाहाता येतात. (Cauvery Nisargadhama)
Coorg, Karnataka Travel
Sakal
नागरहोल सफारीदरम्यान वाघ, हरीण, हत्ती पाहायला मिळतात. वन्यजीव प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. (Nagarhole National Park)
Coorg, Karnataka Travel
Sakal
कुर्गमधील प्रसिद्ध शहरातील ओंकारेश्वर मंदिर १८२० मध्ये एका दिवंगत ब्राह्मणाच्या आत्म्याला शांत करण्यासाठी राजा लिंगराजेंद्र द्वितीय यांनी बांधले. येथे हिंदू आणि इस्लामिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो.
Coorg, Karnataka Travel
Sakal
नामद्रोलिंग मठ हे ३ मजली बौद्ध मंदिर असून येथे 5000 हून अधिक भिक्षु आणि ननांचे निवासस्थान आहे. याशिवायही पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य, मडिकेरी किल्ला यांसारखे अनेक पर्यटन स्थळं कुर्गमध्ये आहेत.
Coorg, Karnataka Travel
Sakal
कुर्गला जाण्यासाठी विमान, बस किंवा ट्रेनने बँगलोर, म्हैसूर किंवा मँगलोर या शहरांमधून जाता येते. तिथे राहण्यासाठी अनेक हॉटेल्स, होमस्टे, हॉस्टेल असे विविध पर्याय आहेत.
Coorg, Karnataka Travel
Sakal
कुर्गला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च आहे. पण तिन्ही ऋतुमध्ये या ठिकाणाचा आनंद घेता येतो, मात्र पावसाळ्यात येथे खूप पाऊस पडत असल्याने बरीच काळजीही घ्यावी लागते.
Coorg, Karnataka Travel
Sakal
Pondicherry
Sakal