Pranali Kodre
पाँडिचेरी अर्थात पुदुच्चेरी (Puduchherry) हे भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे.
Puducherry
Sakal
पाँडिचेरीमध्ये पूर्वी फ्रेंच वसाहत होती, त्यामुळे संपूर्ण पाँडिचेरीमध्ये भारतीय आणि फ्रेंच संस्कृतीचा अनोखा संगम दिसतो.
Pondicherry
Sakal
येथील व्हाईट टाऊनमध्ये फ्रँच वास्तुकलेचा अनुभव येतो. तिथे विविध रंगांच्या फ्रेंच धाटणीच्या इमारती पाहायला मिळतात.
Pondicherry
Sakal
व्हाईट टाऊनमधील अनोखे रस्ते आणि येथील कॅफे युरोपमध्ये असल्याचे भास करून देतात.
Pondicherry
Sakal
पाँडिचेरीमधील जागोजागी असलेल्या अनेक छोटे-मोठे कॅफे सुंदर कॅफेंमध्ये काही स्पेशल युरोपियन पदार्थांची चवही चाखायला मिळते.
Pondicherry
Sakal
याशिवाय पाँडिचेरीमध्ये काही म्युझियमही चांगले आहेत, यातील पाँडिचेरी म्युझियममध्ये फ्रेंच राजवटीतील वस्तूही पाहायला मिळतात.
Pondicherry
Sakal
पाँडिचेरीमध्ये श्री अरबिंदो आश्रम हे शांत आणि आध्यत्मित ठिकाण असून तिथे श्री अरबिंदो आणि द मदर यांच्या समाधी आहेत.
Pondicherry
Sakal
'बॅसिलिका ऑफ द सेक्रेड हार्ट ऑफ जीझस' हे पाँडिचेरी रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेले अतिशय जुने आणि सुंदर चर्च आहे.
Sacred Heart Basilica Church Podicherry
Sakal
याशिवाय पाँडिचेरीपासून साधारण १५ किमी अंतरावर ऑरोविल ही प्रायोगिक नगरी असून येथील मातृमंदिर हे आकर्षणचे मुख्य केंद्र आहे. हे नगरी मानवतेच्या एकतेची प्रतिक मानली जाते.
Auroville, Pondicherry
Sakal
ऑरोविलमधील निसर्गरम्य वातावरण मन उत्साही करते, संपूर्ण दिवस येथे घालवता येतो.
Auroville, Pondicherry
Sakal
इतकेच नाही, तर पाँडिचेरीमध्ये अनेक सुंदर समुद्र किनारे असून येथे शांत संध्याकाळ किंवा पहाटे फेरफटका मारता येऊ शकतो.
Pondicherry
Sakal
येथील रॉक बीच, पॅराडाईज बीच, सेरेनिटी बीच, ऑरोविल बीच प्रसिद्ध आहेतच, शिवाय इडन बीच सर्वात स्वच्छ बीच आहे.
Pondicherry Beaches
Sakal
इडन बीच लोकप्रिय असून या समुद्रकिनाऱ्याला 'ब्लु फ्लॅग' मानांकनही मिळाले आहे.
Eden Beach, Pondicherry
Sakal
Diveagar Tourism
Sakal