पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 5 ठिकाणांना नक्की द्या भेट!

Aarti Badade

महाराष्ट्राचे अद्भूत निसर्ग सौंदर्य

पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य अगदी बहरू येते; हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि धबधब्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

लोणावळा

मुंबई-पुण्याजवळ असलेले लोणावळा हे सर्वात लोकप्रिय ठिकाण असून भुशी डॅम, राजमाची आणि लायन्स पॉईंट येथील धुके पर्यटकांना भुरळ पाडते.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

माळशेज घाट

मुंबई-पुण्यापासून सहज पोहोचता येणारा माळशेज घाट हा मान्सूनप्रेमींसाठी स्वर्ग असून, येथे असंख्य धबधबे आणि दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

महाबळेश्वर

'हिल स्टेशनची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाळ्यात लिंगमाळा धबधबा आणि आर्थर सीट पॉईंटवर ढगांचा विलोभनीय खेळ पाहायला मिळतो.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

माथेरान

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे आशियातील एकमेव 'गाड्यांना बंदी' असलेले हिल स्टेशन असून, येथील लाल मातीच्या पाऊलवाटा धुक्यात खूप सुंदर दिसतात.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

कोलाड

साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी रायगडमधील कोलाड सर्वोत्तम असून, पावसाळ्यात कुंडलिका नदीवर होणारी 'रिव्हर राफ्टिंग' हे येथील मुख्य आकर्षण आहे.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

हवामानाचा अंदाज घेणे गरजेचे

पावसाळ्यात कोणत्याही डोंगराळ किंवा घाटाच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यापूर्वी स्थानिक हवामान आणि प्रशासनाचे अंदाज काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

निसर्गाचा आनंद

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी आणि मान्सूनचा आनंद घेण्यासाठी या ५ ठिकाणांचा पर्याय अतिशय उत्तम आहे.

Monsoon Destinations in Maharashtra

|

Sakal

GK : जगातील एकमेव आश्चर्य! असा कोणता समुद्र आहे ज्याला अजिबात किनारा नाही?

Sargasso sea unique ocean currents facts

|

Sakal

येथे क्लिक करा