Pranali Kodre
बेडरूममध्ये झाडे ठेवल्याने खोलीची सुंदरता अधिक वाढते. शिवाय हवा शुद्ध होण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
Best Bedroom Plants
Sakal
बेडरूमसाठी काही उत्तम झाडे आहेत, ज्यांना कमी प्रकाश आणि कमी देखभाल लागते. (Best Bedroom Plants)
Best Bedroom Plants
Sakal
स्नेक प्लांट रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडते आणि शांत झोप लागण्यासाठी अत्यंत उत्तम असून खूप कमी पाणी आणि प्रकाश लागतो.
Snake Plant : Best Bedroom Plants
Sakal
पीस लिली हवा शुद्ध करण्यासाठी ओळखले जाते, तसेच या झाडाची पांढरी फुले बेडरूमला एक शांत आणि सुंदर लुक देतात. सावलीतही हे झाड वाढते.
Peace Lily : Best Bedroom Plants
Sakal
मनी प्लांट लोकप्रिय असून घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि हवा स्वच्छ ठेवण्यासाठी ओळखले जाते. मनी प्लांट कुंडीत किंवा काचेच्या बाटलीत पाण्यात देखील लावता येते.
Money Plant : Best Bedroom Plants
Sakal
जर तुमची बेडरूम मोठी असेल, तर कोपऱ्यात ठेवण्यासाठी एरेका पाम चांगला पर्याय असून हवेतील आर्द्रता (Humidity) टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. झाडाला अप्रत्यक्ष (Indirect) सूर्यप्रकाश आणि मातीत थोड्या ओलाव्याची गरज असते.
Areca Palm : Best Bedroom Plants
Sakal
स्नेक प्लांटप्रमाणेच कोरफडदेखील रात्री ऑक्सिजन सोडते. शिवाय औषधी असून हवेतील विषारी घटक शोषून घेण्यासाठीही उपयोगी आहे. खिडकीसारखे थोडे सूर्यप्रकाश असलेले ठिकाण उत्तम.
Aloe Vera : Best Bedroom Plants
Sakal
स्पायडर प्लांट हवेतील दुर्गंधी आणि विषारी वायू शोषून घेते. हे झाड 'हँगिंग पॉट'मध्येही छान दिसते. या झाडाला जास्त काळजीची गरज नसते.
Spider Plant : Best Bedroom Plants
Sakal
जर घरात लहान मूल किंवा पाळीव प्राणी असतील तर पीस लिली आणि स्नेक प्लांट त्यांच्यापासून लांब असूद्यात. त्यांची पानं पचनास घातक ठरू शकतात.
Best Bedroom Plants
Sakal
Grow Fresh Fenugreek at Home
Sakal