मेथीच्या भाजीची घराच्या गॅलरीत करा लागवड; सोप्या टिप्स

Pranali Kodre

मेथीची भाजी

मेथीची भाजी घरच्या घरी अगदी सहज लावता येते.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

कुंडी

साधारण 6–8 इंच खोल कुंडी शक्यतो पसरट कुंडी किंवा प्लॅस्टिकचा टब/ट्रे देखील मेथीच्या लागवडीसाठी पुरेसा असतो. पण त्याखाली पाण्याच्या निचऱ्यासाठी छिद्र असावं.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण

५०% बागेतील माती, ३०% कंपोस्ट किंवा शेणखत आणि २०% कोकोपीट किंवा वाळू असे मातीचे मिश्रण मेथीसाठी योग्य ठरते.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

पेरणी

स्वयंपाकघरातील साधे मेथीचे दाणे (Fenugreek seeds) ६-८ तास पाण्यात भिजवा, त्यामुळे लवकर रोप उगवते. हे दाणे मातीवर पसरवा आणि त्यावर हलका मातीचा थर द्या.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

पाणी

सुरुवातीला स्प्रे करुन किंवा हाताने थोडे पाणी शिंपडा. माती केवळ ओलसर ठेवा, जास्त चिखल करू नका. अति पाणी मेथीला देऊ नका, पाण्याचा योग्य निचरा होईल, याची काळजी घ्या.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश

मेथीला दररोज ३-४ तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी कुंडी ठेवा.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

महिनाभरात मेथी तयार

साधारण ४-७ दिवसात छोटी रोपं दिसायला लागतात आणि २५-३० दिवसात मेथीची भाजी तयार होते. मेथीचे वरची पाने/कोवळे देठ कापून घेतल्यास पुन्हा वाढू शकते.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

छोटी टिप

मेथीची लागवड एकाच वेळी करण्यापेक्षा ७-१० दिवसांच्या अंतराने थोड्या-थोड्या बिया पेरल्या, तर घरात सतत ताजी मेथी मिळत राहते.

Grow Fresh Fenugreek at Home

|

Sakal

आलं घरच्या घरी कुंडीत कसं लावायचं?

Grow Ginger at Home

|

Sakal

येथे क्लिक करा