Monika Shinde
पावसात रस्ते ओले आणि घसरणारे होतात. चुकीचं फुटवेअर वापरल्यास पाय घसरू शकतात किंवा चप्पल खराब होऊ शकतात. योग्य निवड करणं महत्त्वाचं आहे.
रबरच्या चपला पाण्यात भिजल्या तरी लगेच सुकतात. या चपला स्वस्त, टिकाऊ आणि सहज वापरण्यासारख्या असल्याने पावसाळ्यात उपयोगी पडतात.
गम बूट्स पाय पूर्ण झाकतात आणि चिखलापासून संरक्षण करतात. विशेषतः मुसळधार पावसात किंवा गावाकडे प्रवास करताना हे खूप उपयुक्त ठरतात.
पावसाळ्यात क्रॉक्ससारख्या चपला सर्वोत्तम पर्याय ठरतात. त्या स्लिप-प्रूफ असतात, सहज धुवता येतात आणि दिवसभर वापरल्या तरी पाय दुखत नाहीत
साध्या रबर स्लीपर्स छोट्या बाहेर पडण्यासाठी योग्य असतात. हे पायांना घाम न येऊ देता आराम देतात आणि सहज निघतात.
पावसात कापडी किंवा लेदर चप्पल टाळा. या भिजल्यावर उग्र वास येतो आणि पटकन खराब होतात. आरोग्याच्याही दृष्टीने हे धोकादायक असते.
पावसात न घसरणाऱ्या आणि पाण्यात खराब न होणाऱ्या चपला वापरा. पाय सुरक्षित असतील, तर पावसात भिजायला अजिबात भीती वाटत नाही.