Monika Shinde
तणाव म्हणजे मानसिक आणि शारीरिक थकवा, जो सतत चिंता, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांमुळे होतो. काम, नातेसंबंध, आर्थिक अडचणी यामुळे तणाव वाढतो. वेळेत लक्ष दिलं नाही तर आरोग्य बिघडू शकतं.
दीर्घ आणि शांत श्वास घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते. दररोज १० मिनिटे “प्राणायाम” केल्याने तणावाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. मनःशांतीसाठी हा अत्यंत सोपा उपाय आहे.
हरित निसर्ग, झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि मोकळी हवा याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. दररोज फक्त ३० मिनिटे निसर्गात चालल्याने तणाव नक्कीच कमी होतो.
सततच्या नोटिफिकेशनमुळे मन सतत बेचैन राहतं. दररोज थोडा वेळ मोबाईल बंद ठेवा. “डिजिटल डिटॉक्स” करून मेंदूला आराम देणं खूप गरजेचं आहे.
आपल्या भावना कुणासमोर व्यक्त करणं तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा कधी-कधी थेरपिस्टशी बोलणं फार उपयोगी ठरतं.
प्रसन्न, शांत संगीत तणाव दूर करतं आणि मन प्रसन्न करतं. दररोज आवडती गाणी ऐका, डोळे बंद करा आणि फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा हा एक प्रभावी उपाय आहे.
दिवसभराच्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. वाचन, चित्रकला, छंद, किंवा फक्त निवांत बसणं हे सगळं तणाव दूर ठेवण्यासाठी मदत करतं.