Monika Shinde
यंदा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करा. मुलांसोबत फिरायला जाऊन देशाचा इतिहास, संस्कृती आणि शौर्य जवळून अनुभवण्याची ही उत्तम संधी आहे.
Republic Day
esakal
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणारी भव्य प्रजासत्ताक दिन परेड मुलांसाठी प्रेरणादायी ठरते. लष्करी ताकद आणि सांस्कृतिक चित्ररथ पाहण्याचा खास अनुभव मिळतो.
Duty Path (Rajpath)
esakal
इंडिया गेट हे शहीद जवानांच्या स्मृतीचे प्रतीक आहे. येथे भेट दिल्यास मुलांना बलिदानाचे महत्त्व समजते आणि कुटुंबासोबत शांत वेळ घालवता येतो.
India Gate
esakal
दिल्लीतील लाल किल्ला भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो. स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि लाईट अँड साउंड शो मुलांना विशेष आवडतो.
Red Fort
esakal
भारतीय सैनिकांच्या शौर्याला समर्पित नॅशनल वॉर मेमोरियल हे ठिकाण मुलांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण करते.
National War Memorial
esakal
कुतुबमिनारसारखी ऐतिहासिक स्थळे पाहिल्याने मुलांना भारताच्या प्राचीन स्थापत्यकलेची ओळख होते आणि इतिहास अभ्यास अधिक रंजक बनतो.
Qutub Minar
esakal
जंतरमंतर येथे खगोलशास्त्राची ओळख होते. विज्ञान आणि इतिहास यांचा संगम अनुभवण्याची संधी मुलांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी आहे.
Jantar Mantar
esakal