Monika Shinde
मधुमेह असलेल्या रुग्णांनी भात खाणं पूर्णपणे टाळावं लागतं असं नाही. योग्य प्रकारचा भात निवडल्यास साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
पांढऱ्या तांदळात फायबर्स कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे तो रक्तातील साखर लवकर वाढवतो, म्हणून टाळावा.
ब्राऊन राईसमध्ये फायबर्स भरपूर असतात आणि तो हळूहळू पचतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
लांब दाण्याचा बासमती भात कमी GI असलेला असतो. नियंत्रित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने शिजवून खाल्ल्यास फायदेशीर ठरतो.
रेड राईसमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स भरपूर असतात. मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
क्विनोआ, बाजरी, ज्वारी किंवा फोडणीचा भात हे पर्याय रक्तातील साखर वाढवणार नाहीत आणि पचनासही हलके असतात.
भात जरी योग्य प्रकारचा निवडला, तरी प्रमाण महत्त्वाचे आहे. एका जेवणात ½ ते 1 कप भात पुरेसा असतो.