Monika Shinde
नाश्ता असावा असा जो तुमचं आरोग्य राखेल. खाली दिलेले ५ पदार्थ डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम आहेत.
नाचणीत फायबर आणि कॅल्शियम भरपूर असतं. याने साखर हळूहळू वाढते आणि पचनही सुधारते. नारळाच्या चटणीसह खा.
कडधान्य आणि भाज्यांनी भरलेला पराठा साखरेवर नियंत्रण ठेवतो. तूप न लावता तव्यावर भाजून घ्या आणि दहीसोबत खा.
मूग, हरभरा, मटकी यांसारख्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असते. सकाळी यांची कोशिंबीर उत्तम नाश्ता ठरते.
ओट्समध्ये सोल्युबल फायबर असते, जे रक्तातील साखर स्थिर ठेवते. भाज्या घालून केलेला ओट्स उपमा पौष्टिक आणि स्वादिष्ट असतो.
हिरव्या मूग डाळीपासून तयार चिला (थालीपीठासारखा) प्रोटीनयुक्त आणि हलका असतो. साखर नियंत्रणासाठी परिपूर्ण पर्याय.
साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाश्ता हा केवळ पोट भरणारा नसून, पोषणमूल्यांनी भरलेला असावा. योग्य प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असलेले हे पदार्थ तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम साथ देतील.
नाश्ता चुकवू नका. साखरेचा आहारातून योग्य आहाराने मुकाबला करा. दररोज हे पदार्थ आहारात घालून आरोग्य सुधारवा.