यंदा दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी करा छोट्या वस्तू

Anushka Tapshalkar

दसरा

अश्विन शुक्ल दशमीला दसरा साजरा होतो; रावण दहन होते आणि आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात, तसेच सोने-चांदीची खरेदीही जोरात होते.

Dussehra

|

sakal

सोन्याची खरेदी

दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशी या सणांमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे त्यांची मागणी वाढत असते. परंतु, यंदा सोन्याचे दर सतत वाढत आहेत.

Gold Purchase

|

sakal

सोन्याच्या किंमतीत वाढ

२०२५ मध्ये सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ४०% वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रतिदहा ग्रॅम १,०७,४५० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १,१७,३०० रुपये (जीएसटीशिवाय) आहे. जीएसटीसह ही किंमत १,२१,५०० रुपये आहे.

Gold Price in India

|

sakal

खरेदीची मात्रा कमी, किंमत जास्त

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी १०–३०% ने कमी होऊ शकते, परंतु एकूण विक्री मूल्य जास्त राहील कारण किंमती उच्च पातळीवर आहेत.

Small Items to Purchase on Dussehra

|

sakal

या डिझाइन्सची मागणी वाढली

वाढत्या किंमतींमुळे जड दागिन्यांच्या ऐवजी हलक्या, १४–१८ कॅरेट दागिन्यांची मागणी वाढली आहे. तुम्हाला सुद्धा सोनं वाचवून कमी किंमतीत खरेदी करायची असेल कर पुढील पर्याय निवडू शकता.

Dussehra Gold Trends

|

sakal

१४-१८ कॅरेटचे दागिने

१४-१८ कॅरेट सोन्याचे दागिने २४ कॅरेटच्या दागिन्यांच्या तुलनेत कमी किमतीत म्हणजेच ८८,९८० रुपयांना उपलब्ध आहेत. जर तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कमी किमतीत सोनं खरेदी करायचं असेल, तर ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते.

14-18k Gold

|

sakal

सोन्याची नाणी

सणाचे औचीत्य तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल आणि सोनं वाचवायचे असेल तर सोन्याची नाणी उत्तम पर्याय आहे.

Gold Coin

|

sakal

सोन्याचे बार/ बिस्कीट

सोन्याचे बिस्कीट हे शुद्ध स्वरूपातील सोनं असतं. त्यामुळे ही देखील एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.

Gold Biscuit

|

sakal

अंगठ्या

हलक्या वजनाच्या अंगठ्या किंमतीला कमी असल्याने यंदा तुम्ही अंगठ्या खरेदी करून सोन्या मध्ये गुंतवणूक करू शकता.

Rings

|

sakal

नाजूक कानातले किंवा पेंडंट

तुमच्या मुलीला, बायकोला, आईला किंवा बहिणीला तुम्ही नाजूक कानातले किंवा गळ्यातल्या चैनीतील पेंडंट भेट देऊ शकता.

Pendant and Studs

|

sakal

"सोनं घ्या सोन्यासारखं राहा!" जाणून घ्या आपट्याच्या पानांचे गुणकारी फायदे

Health Benefits of Apta Leaf | Dussehra

|

sakal

आणखी वाचा