स्नोफॉल लव्हर्स! बर्फ पाहण्यासाठी भारतातील 5 टॉप डेस्टिनेशन्स

Aarti Badade

हिवाळी पर्यटनाचा आनंद!

जानेवारी महिना बर्फवृष्टी पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. भारतातील अशा ५ ठिकाणांची माहिती घेऊया जिथे तुम्हाला 'व्हाईट विंटर' अनुभवता येईल.

Snowfall in India January

|

Sakal

गुलमर्ग - काश्मीरचा विंटर वंडरलँड

गुलमर्ग हे बर्फप्रेमींसाठी नंदनवन आहे. येथे जानेवारीत जोरदार बर्फवृष्टी होते. जगातील सर्वात उंच केबल कार 'गोंडोला'मधून बर्फाच्छादित हिमालयाचे विहंगम दृश्य पाहता येते.

Snowfall in India January

|

Sakal

औली - भारताची स्कीइंग राजधानी

उत्तराखंडमधील औली येथे जानेवारीत सर्वाधिक बर्फ असतो. स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी तुम्ही रोपवे राईड्सचा आनंद घेऊ शकता.

Snowfall in India January

|

Sakal

सोनमर्ग आणि पहलगाम - शांत दऱ्या

जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत ठिकाणी बर्फाचा आनंद घ्यायचा असेल, तर काश्मीरमधील सोनमर्ग आणि पहलगाम सर्वोत्तम आहेत.

Snowfall in India January

|

Sakal

लाचुंग आणि युमथांग

ईशान्य भारतातील 'स्नो किंगडम' पाहायचे असेल तर सिक्कीमला नक्की जा. युमथांग व्हॅली जानेवारीत पूर्णपणे बर्फाखाली असते. येथील निसर्गदृश्ये एखाद्या चित्रासारखी सुंदर दिसतात.

Snowfall in India January

|

Sakal

कुफरी

हिमाचल प्रदेशातील सिमल्यापासून जवळच असलेले कुफरी जानेवारीत पर्यटकांनी गजबजलेले असते. येथे तुम्ही स्लेज राईड्स आणि स्नोबॉल सारख्या खेळांचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

Snowfall in India January

|

Sakal

प्रवासासाठी काही टिप्स

उबदार लोकरीचे कपडे, हातमोजे आणि सनग्लासेस सोबत ठेवा.बर्फावर चालण्यासाठी योग्य शूज (Snow Boots) भाड्याने घ्या.प्रवासाचे बुकिंग किमान १५ दिवस आधी करा.

Snowfall in India January

|

Sakal

रात्र होताच गायब होतं हे सुंदर बेट! सकाळी गर्दी, रात्री फक्त समुद्र

Vanishing Island Philippines

|

Sakal

येथे क्लिक करा