Aarti Badade
जगात अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत, पण फिलीपिन्समधील हे बेट सर्वांत वेगळं आहे. दिवसा येथे पर्यटकांचा मेळा असतो, पण सूर्यास्त होताच हे संपूर्ण बेट नजरेआड होतं.
Vanishing Island Philippines
Sakal
फिलीपिन्सच्या बोहोल प्रांताजवळ हे 'व्हॅनिशिंग आयलंड' (Vanishing Island) वसलेले आहे. पांढरीशुभ्र वाळू आणि निळंशार पाणी हे या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे.
Vanishing Island Philippines
Sakal
हे कोणतेही जादुई बेट नाही, तर समुद्राच्या मध्यभागी असलेली १ किमी लांब वाळूची पट्टी (Sandbar) आहे. भरती-ओहोटीच्या चक्रामुळे हे बेट दिसतं आणि अदृश्य होतं.
Vanishing Island Philippines
Sakal
जेव्हा समुद्राला ओहोटी असते, तेव्हा ही वाळूची पट्टी वर येते. पर्यटक येथे वॉक करतात, स्नॉर्कलिंगचा आनंद घेतात आणि चविष्ट सी-फूडवर ताव मारतात.
Vanishing Island Philippines
Sakal
दुपारी ४ वाजेनंतर समुद्राला भरती येऊ लागते. हळूहळू पाण्याची पातळी वाढते आणि आधी पर्यटकांच्या छत्र्या, मग टेबल-खुर्च्या आणि शेवटी संपूर्ण बेट ३-५ फूट पाण्याखाली बुडतं.
Vanishing Island Philippines
Sakal
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या बेटाचा मागमूसही उरत नाही. जिथे दुपारी हजारो लोक होते, तिथे रात्री फक्त लाटांचा आवाज येतो. म्हणूनच याला 'अदृश्य बेट' म्हणतात.
Vanishing Island Philippines
Sakal
येथील गाईड्स दुपारी ३:३० पर्यंत सर्व पर्यटकांना परत बोटीत बसवतात. जर कोणी उशिरा आला, तर बोटीवाले जास्तीचे पैसे आकारतात. अनेकदा रात्री रेस्क्यू ऑपरेशनही करावे लागते.
Vanishing Island Philippines
sakal
२०२५ मधील हे टॉप पर्यटन स्थळ आहे. केवळ ७०० ते ११०० रुपयांत तुम्ही बोट सफर, जेवण आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासारखा आहे!
Vanishing Island Philippines
Sakal
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal