पुजा बोनकिले
उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
अशावेळी उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
रोज सकाळी उठल्यावर अनशापोटी एक ग्लास आवळ्याचा रस प्यावा, किंवा रोज एक आवळा (मोरावळा) खावा.
कलिंगड, द्राक्षे, खरबूज, संत्री-मोसंबी ही सध्या उपलब्ध असलेली हंगामी फळे खावीत.
आठ-दहा काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालून त्या सकाळी खाव्यात.
ताज्या भाज्या भरपूर खा.
पुरेसे पाणी प्या.
जंक फूड टाळाच; पण आंबवलेले पदार्थ, रेफ्रिजरेटरमधील पदार्थही टाळावेत.
पुरेशी झोप घ्या. रात्रीच्या वेळी सहा-सात तास झोप हवी. रात्रीची जागरणे व दिवसाची झोप हानिकारक ठरते.
दिवसाची सुरुवात सकाळी लवकर व्यायामाने करा.