पुण्याजवळचा सनसेट, बोटिंग आणि ट्रेकिंगचा परफेक्ट प्लॅन; पाहताच तुम्हीही बॅग पॅक कराल!

Vinod Dengale

2 दिवसांचा प्लॅन

पुण्यात राहून जर तुम्हाला 2 दिवसांचा भन्नाट फिरण्याचा प्लॅन करायचं असेल तर हे 3 लोकेशन तुम्हाला आध्यात्मिक, सनसेट, बोटिंग आणि ट्रेकिंगचा अनुभव देतील.

हडशी-पवना आणि तिकोना

हा प्लॅन आहे हडशी-पवना आणि तिकोना किल्ला. हा सर्व प्रवास जाऊन-येऊन फक्त 120 किलोमीटर चा आहे.

1 तास

पुण्याहून तुम्ही सकाळी 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हडशीला 1 तासात गाडीवर आरामात जाऊ शकतात.

हडशी

हडशीमध्ये तुम्हाला निसर्गात वसलेले पांडुरंग मंदिर, संत दर्शन म्यूजियम, हडशी तलाव असा सुंदर अनुभव घेत येईल.

बोटिंग

त्यानंतर 4 वाजता तुम्ही पवना लेककडे निघजू शकता. या ठिकाणी तुम्ही सायंकाळच्या वेळी बोटिंग करू शकता.

सनसेट

बोटिंग नंतर तुम्हाला तलावाच्या कडेल बसून सुंदर असा सनसेटचा नजारा दिसेल.

टेंट

रात्रीच्या वेळी तुम्ही पवना मध्येच टेंट मध्ये राहू शकता. या ठिकाणी तुम्हाला जेवणाची सोय केली जाते. तसेच या ठिकाणी तुम्ही खेळ खेळू शकता.

तिकोना

दुसऱ्या दिवशी सकाळीच पवना वरून निघून तुम्ही तिकोना किल्ल्यावर जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घेता येईल.

थंड हवा, सनराइज-सनसेटचा नजारा…सह्याद्रीच्या कुशीतलं हे ठिकाण तुम्हाला प्रेमात पाडणार!

eSakal