Monika Shinde
योगासना संदर्भात योग्य वेळ निवडणं खूप महत्त्वाचं असतं. चला जाणून घेऊया सर्वोत्तम वेळ!
सकाळी, सूर्योदयाच्या सुमारास योगासन केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात.
योग करण्याआधी शरीराला पुरेशी विश्रांती मिळालेली असावी. त्यामुळे सकाळी झोप पूर्ण झाल्यावर योगासने करा.
सकाळी योग केल्यास दिवसभर शरीरात लवचिकता आणि ऊर्जा टिकते.
सकाळी वेळ मिळत नसेल, तर जेवणानंतर ४ तासांची विश्रांती घेऊन योगासनं करू शकता.
रात्रीच्या जेवणाच्या किमान अर्धा तास आधी योगासनं केली तरी चालतात पण पोट रिकामं असणं आवश्यक!
कधीही योगासनं करताना पोट रिकामं असणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा.
योगासनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल, तर योग्य वेळ आणि पद्धत पाळणं आवश्यक आहे.