ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Varsha Balhe

कॉफी

ब्लॅक कॉफी अनेक जण सकाळची सुरुवात करण्यासाठी किंवा कामाचा थकवा घालवण्यासाठी पितात. पण ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, असा प्रश्न अनेकांना पडतो.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

सकाळ

सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्यापेक्षा थोड्या वेळाने कॉफी घेणं चांगलं मानलं जातं. यावेळी शरीरातील कॉर्टिसोलची पातळीही लक्षात घेतली जाते.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

वेळ

सकाळी साधारण ९:३० ते ११:३० या वेळेत ब्लॅक कॉफी घेता येते. मात्र, प्रत्येकाच्या शरीराची कॉफीला होणारी प्रतिक्रिया वेगळी असू शकते.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

व्यायाम

व्यायाम करण्यापूर्वी कॉफी घेणाऱ्यांसाठीही एक ठराविक वेळ असते. साधारण ३० ते ४५ मिनिटे आधी कॉफी घेतल्यास कॅफिनचा परिणाम व्यायामाच्या वेळी जाणवू शकतो.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

दुपार

दुपारच्या जेवणानंतर सुस्ती जाणवत असेल तर काही जण ब्लॅक कॉफी घेतात. मात्र, उशिराची कॉफी घेतल्यास रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

रिकाम्या पोटी

उठल्याबरोबर रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी घेणं प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. काही लोकांना यामुळे ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

रात्री

रात्रीची कॉफी झोपेचा खेळ बिघडवू शकते. कॅफिनचा परिणाम अनेक तास राहू शकत असल्याने झोपण्याच्या किमान ६ तास आधी कॉफी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

किती प्यावी?

ब्लॅक कॉफीही प्रमाणातच प्यावी. जास्त कॅफिन घेतल्यास अस्वस्थपणा, धडधड किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कॉफीची वेळ आणि प्रमाण दोन्ही आपल्या शरीराला किती सूट होतं, यावर ठरवणं महत्त्वाचं आहे.

BEST TIME TO DRINK BLACK COFFEE

|

esakal

बिबट्या आणि चित्ता यात काय फरक असतो?

LEOPARD VS CHEETAH

|

esakal

येथे क्लिक करा