Varsha Balhe
ओळख बिबट्या आणि चित्ता दिसायला सारखे वाटतात. पण त्यांच्या अंगावरील ठिपक्यांपासून ते धावण्याच्या वेगापर्यंत अनेक गोष्टी वेगळ्या आहेत.
LEOPARD VS CHEETAH
esakal
चित्त्याच्या अंगावर काळे, गोल ठिपके असतात. बिबट्याच्या अंगावर मात्र फुलासारखी नक्षी दिसते.
LEOPARD VS CHEETAH
esakal
चित्त्याच्या डोळ्यांपासून तोंडाच्या बाजूला काळ्या रेषा गेलेल्या असतात. बिबट्याच्या चेहऱ्यावर अशा रेषा नसतात.
LEOPARD VS CHEETAH
esakal
चित्ता सडपातळ आणि लांब पायांचा असतो. बिबट्या मात्र मजबूत शरीराचा आणि स्नायूंची बांधणी असलेला असतो.
LEOPARD VS CHEETAH
esakal
चित्ता हा जमिनीवर सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी आहे. तो कमी अंतरासाठी ताशी सुमारे १०० किमी किंवा त्याहून अधिक वेग गाठू शकतो. बिबट्या मात्र वेगापेक्षा ताकद आणि चपळाईसाठी ओळखला जातो.
LEOPARD VS CHEETAH
esakal
बिबट्या झाडावर सहज चढू शकतो. शिकार पकडल्यानंतर इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तो ती झाडावरही नेतो. चित्ता मात्र बिबट्यासारखा झाडावर चढण्यात तरबेज नसतो.
LEOPARD VS CHEETAH
esakal
चित्ता सिंह किंवा बिबट्यासारखी डरकाळी फोडत नाही. तो चिवचिवण्यासारखे आवाज काढू शकतो. बिबट्या मात्र गुरगुरतो आणि मोठ्या आवाजात ओरडूही शकतो.
LEOPARD VS CHEETAH
esakal
PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE
esakal