Anushka Tapshalkar
खजूर का खावे?
खजूर (Dates) हे नैसर्गिक ऊर्जा देणारे फळ आहे. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि महत्त्वाचे सूक्ष्मपोषक घटक असतात, जे शरीराला ताकद आणि पचनाला आधार देतात.
Dates
sakal
खजूरचे पोषणमूल्य
साधारण 100 ग्रॅम (४ मेजूल खजूर) इतकेच प्रमाण योग्य मानले जाते. जास्त खाल्ल्यास कॅलरी जास्त वाढू शकतात, त्यामुळे मर्यादा पाळणे महत्त्वाचे.
Dates nutrition
ऊर्जेसाठी खजूर कधी खावेत?
वर्कआउट किंवा व्यायामाच्या आधी खजूर खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते. नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम स्नायूंना ताकद देतात व थकवा कमी करतात.
Natural Energy Source
sakal
पचनासाठी खजूर कधी खावेत?
दिवसातून जेवणांच्या मध्ये २–३ खजूर खाल्ल्यास फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांतील चांगल्या जिवाणूंना मदत होते.
Gut Health
Sakal
खजूर आणि रक्तातील साखर
खजूर नैसर्गिक साखर असले तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास साखर वाढू शकते. त्यामुळे खजूर प्रथिनांसोबत खा – उदा. दही, पीनट बटर किंवा बदाम बटरसोबत.
Blood Sugar Levels
sakal
मेंदू आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदे
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूचे आरोग्य सुधारतात आणि स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.
immunity
हृदयासाठी खजूर फायदेशीर
खजूरमधील पॉलीफेनॉल्स चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
Dates Best for Heart
Sakal