गाडीत पेट्रोल भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ; जाणून घ्या तुमचे पैसे वाचवणारी खास ट्रिक!

सकाळ डिजिटल टीम

योग्य वेळ

गाडीत पेट्रोल भरण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि त्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या.

best time to fill petrol

|

sakal 

पहाटे किंवा सकाळी

सकाळी जमिनीचे आणि वातावरणाचे तापमान सर्वात कमी असते. यामुळे पेट्रोल थंड आणि दाट (Dense) असते. जसजसे तापमान वाढते, तसे पेट्रोल प्रसरण पावते, ज्यामुळे तुम्हाला कमी घनतेचे इंधन मिळते.

best time to fill petrol

|

sakal 

विज्ञानाचा आधार

इंधन हे तापमानानुसार प्रसरण पावते. सकाळी पेट्रोलची घनता जास्त असल्याने, तुम्हाला एका लिटरमध्ये जास्त 'मास' किंवा इंधन मिळते. दुपारच्या वेळी पेट्रोलचे आकारमान वाढलेले असते, त्यामुळे पैसे पूर्ण देऊनही प्रत्यक्षात इंधन कमी मिळते.

best time to fill petrol

|

sakal 

दुपारच्या वेळी

दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊन कडक असते. या काळात पेट्रोल पंपाच्या जमिनीखालील टाक्यांमधील तापमान वाढलेले असते. या वेळी पेट्रोल भरल्यास बाष्पीभवनामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

best time to fill petrol

|

sakal 

मोठा टँकर

जर पेट्रोल पंपावर मोठा टँकर इंधन रिकामे करत असेल, तर तिथे लगेच पेट्रोल भरू नका. इंधन भरताना टाकीच्या तळाशी असलेली घाण आणि कचरा वर येतो, जो तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये जाऊन नुकसान करू शकतो.

best time to fill petrol

|

sakal 

डिजीटल मीटर

पेट्रोल भरण्यापूर्वी मीटर 'झिरो' (Zero) वर आहे की नाही याची खात्री करा. तसेच, मीटरमधील पेट्रोलचा दर आणि रिडींग अत्यंत वेगाने बदलत असेल तर लक्ष ठेवा.

best time to fill petrol

|

sakal 

राऊंड फिगर

नेहमी १००, २००, ५०० किंवा १००० अशा राऊंड फिगरमध्ये पेट्रोल भरण्याऐवजी १०५, २१०, ५२० अशा रकमेचे पेट्रोल भरा. काहीवेळा राऊंड फिगरसाठी मशीनमध्ये सेटिंग असण्याची शक्यता असते, जी बदललेल्या आकड्यांमुळे टाळता येते.

best time to fill petrol

|

sakal 

पेट्रोलची शुद्धता

प्रत्येक पेट्रोल पंपावर घनता (Density) तपासण्याचा अधिकार ग्राहकाला असतो. पेट्रोलची घनता 730 ते 800 kg/m3 च्या दरम्यान असावी.

best time to fill petrol

|

sakal 

विश्वासार्ह पेट्रोल

नेहमी गर्दी असलेल्या किंवा नामांकित कंपन्यांच्या अधिकृत पंपावरूनच पेट्रोल भरा. जुन्या पंपांच्या टाक्यांमध्ये गळती किंवा पाणी असण्याची शक्यता असते, ज्यामुळे मायलेज कमी मिळते.

best time to fill petrol

|

sakal 

निर्जीव असूनही 'हिरे' इतके महाग का असतात?

Why Are Diamonds So Expensive Despite Being Non-Living?

|

eSakal

येथे क्लिक करा