Aarti Badade
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढतेय. याकडे दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.
BP Medicine Timing
Sakal
अनेकांना वाटेल तेव्हा औषध घेण्याची सवय असते. मात्र, संशोधनानुसार औषधे दररोज एकाच निश्चित वेळी घेणे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
BP Medicine Timing
Sakal
काही संशोधनांनुसार, रात्री बीपीची औषधे घेतल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.
BP Medicine Timing
Sakal
औषधाची वेळ तुमच्या रोजच्या कामाशी जोडा (उदा. नाश्ता किंवा रात्रीचे जेवण), जेणेकरून तुम्ही डोस विसरणार नाही. औषध चुकणे हे 'हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी'चे कारण ठरू शकते.
BP Medicine Timing
Sakal
जर तुमचे डॉक्टर तुम्हाला 'डाययुरेटिक्स' (लघवी वाढवणारी औषधे) देत असतील, तर ती सकाळी घेणे जास्त सोयीचे ठरते, जेणेकरून रात्रीच्या झोपेत वारंवार व्यत्यय येणार नाही.
BP Medicine Timing
Sakal
काही रुग्णांमध्ये रात्रीच्या वेळी रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होत नाही. अशा स्थितीत डॉक्टर विशेषतः रात्री औषध घेण्याचा सल्ला देतात.
BP Medicine Timing
Sakal
तुमच्या प्रकृतीनुसार औषधाची नेमकी वेळ ठरवण्यासाठी स्वतःहून निर्णय न घेता, नेहमी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
BP Medicine Timing
Sakal
Causes of leg cramps
Sakal