मधुमेह नियंत्रणासाठी चालण्याची ही सवय अन् वेळ ठरू शकते गेमचेंजर!

Aarti Badade

चालण्याची योग्य वेळ कोणती?

ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी चालणे जास्त फायदेशीर की संध्याकाळी, यावर प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांनी एक्सवर (X) मोठा खुलासा केला आहे.

Post meal walk diabetes control

|

Sakal

सर्वांना एकच नियम लागू होत नाही

डॉ. मोहन यांच्या मते, काही लोक 'मॉर्निंग पर्सन' तर काही 'इव्हनिंग पर्सन' असतात, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या जीवनशैलीनुसार सोयीस्कर वेळ निवडून त्यात सातत्य ठेवावे.

Post meal walk diabetes control

|

Sakal

सकाळच्या चालण्याला प्राधान्य

सकाळी हवा ताजी असते, प्रदूषण कमी असते आणि रात्रीच्या चांगल्या झोपेमुळे शरीर टवटवीत असल्याने सकाळचे चालणे मेंदू व आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Post meal walk diabetes control

|

Sakal

संध्याकाळचे चालणे

सकाळी शक्य न झाल्यास संध्याकाळी चालणे देखील दिवसभराचा मानसिक ताण कमी करण्यास, थकवा दूर करण्यास आणि रात्रीची झोप सुधारण्यास मदत करते.

Post meal walk diabetes control

|

Sakal

'जेवणानंतर चालण्याची' नवीन पद्धत

डॉ. मोहन यांनी अधोरेखित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आता प्रत्येक जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालण्याची एक नवीन आणि प्रभावी पद्धत समोर आली आहे.

Post meal walk diabetes control

|

Sakal

जेवणानंतर १५ मिनिटे

जर तुम्ही नाश्त्यानंतर, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर १०-१५ मिनिटे चाललात, तर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी वेगळे चालण्याची अजिबात गरज भासणार नाही.

Post meal walk diabetes control

|

Sakal

रक्तातील साखरेची वाढ होते नियंत्रित

जेवण केल्यावर शरीरातील साखर वाढू लागते; पण नेमके त्याच वेळी चालल्यामुळे साखरेची ही वाढ लगेच नियंत्रित (Blunted) होते आणि पचनक्रियाही सुधारते.

Post meal walk diabetes control

|

Sakal

७,००० पावले चाला

तुम्ही कोणत्याही वेळी चाला, पण मधुमेह किंवा प्री-डायबेटीस नियंत्रणात ठेवून उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी दररोज किमान ७,००० पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

Post meal walk diabetes control

|

Sakal

‘बिअर प्यायल्याने स्टोन पडतो’ हा समज किती खरा? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Beer for kidney stone benefit or side effect

|

Sakal

येथे क्लिक करा