बाळकृष्ण मधाळे
सोन्यात गुंतवणूक करणे हा भारतीयांचा पारंपरिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. मात्र, प्रत्येक पद्धत फायदेशीर असेलच असे नाही. योग्य माहिती नसताना केलेली गुंतवणूक भविष्यात तोट्याची ठरू शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना ही पद्धत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Gold Investment
esakal
आज बाजारात सोन्यात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
त्यामध्ये -
सोन्याचे दागिने
सोन्याचे बार
सोन्याची नाणी
डिजिटल सोने
गोल्ड ईटीएफ (Gold ETF)
प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत.
Gold Investment
esakal
जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करायची असेल, तर सोन्याचे बार किंवा नाणी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे शुद्ध सोन्यातील गुंतवणूक असून, दीर्घकाळ सुरक्षितपणे साठवता येते. मात्र, त्यासाठी सुरक्षित लॉकर आणि साठवणुकीची व्यवस्था आवश्यक असते.
Gold Investment
esakal
आधुनिक आणि सोपी गुंतवणूक हवी असेल, तर डिजिटल सोने आणि गोल्ड ईटीएफ हे उत्कृष्ट पर्याय आहेत. हे पूर्णपणे ऑनलाइन खरेदी करता येते आणि भौतिक स्वरूपात सोने साठवण्याची गरज नसते. त्यामुळे सुरक्षिततेची कोणतीही चिंता राहत नाही.
Gold Investment
esakal
सोने हा नक्कीच एक विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय आहे. मात्र, ते भावनिकदृष्ट्या नव्हे तर हुशारीने आणि विचारपूर्वक खरेदी करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या गरजा, उद्दिष्टे आणि कालावधी लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडला पाहिजे.
Gold Investment
esakal
बहुतेक लोकांना सोन्याचे दागिने आवडतात, कारण ते घालता येतात; पण गुंतवणुकीच्या दृष्टीने हा सर्वात वाईट पर्याय मानला जातो. कारण, जास्त मेकिंग चार्जेस, अनेकदा कमी शुद्धता, पुनर्विक्री करताना मोठी कपात या कारणांमुळे दागिन्यांमधील गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नाही.
Gold Investment
esakal
याच कारणामुळे सोन्याचे बार आणि गोल्ड ईटीएफ हे सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानले जातात. गोल्ड ईटीएफ हा डिजिटल स्वरूपातील पर्याय असून, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सोन्यात गुंतवणूक करू शकता.
Gold Investment
esakal
यामध्ये भौतिक स्वरूपात सोने साठवण्याची गरज नसते, त्यामुळे चोरी किंवा सुरक्षिततेची कोणतीही भीती राहत नाही. याशिवाय, यामध्ये मेकिंग चार्जेस किंवा जीएसटी लागत नाही आणि किंमत पूर्णपणे पारदर्शक असते. गरज पडल्यास हे सोने कधीही बाजारात सहजपणे विकता येते.
Gold Investment
esakal
सोन्यात गुंतवणूक करताना केवळ परंपरेवर विश्वास न ठेवता योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. दागिन्यांऐवजी सोन्याचे बार किंवा गोल्ड ईटीएफ निवडल्यास तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि फायदेशीर ठरू शकते.
Gold Investment
esakal
Kidney Disease Eye
esakal