जिम नको, डायट नको! दररोज फक्त 30 मिनिटे ‘ही’ 5 योगासने करा

Aarti Badade

वजन कमी करण्यासाठी योग

जिममध्ये न जाता नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल, तर योगासने हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे केवळ चरबी कमी होत नाही, तर शरीर लवचिक आणि सुडौल बनते.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

sakal

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा 'योगासनांचा राजा' मानला जातो. यात १२ आसनांचा समावेश असून, यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि वेगाने कॅलरीज जळण्यास मदत होते.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

फलकासन

पोटावरील हट्टी चरबी कमी करण्यासाठी फलकासन अत्यंत प्रभावी आहे. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पोटाचा घेर कमी होतो.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

त्रिकोणासन

कंबरेच्या बाजूला साठलेली चरबी (Side Fat) कमी करण्यासाठी त्रिकोणासन फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते आणि कंबर लवचिक होते.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

धनुरासन

पोटावर झोपून पाय गुडघ्यात दुमडून धनुष्यासारखा आकार केल्याने पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि मेद कमी होतो.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

वीरभद्रासन

हे आसन केल्याने मांड्या, कंबर आणि हात मजबूत होतात. यामुळे शरीराचे संतुलन सुधारते आणि मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

उत्तम निकालासाठी टिप्स

योगासने नेहमी रिकाम्या पोटी करावीत. दररोज किमान २० ते ३० मिनिटे योगाचा सराव केल्यास एका महिन्यात तुम्हाला तुमच्या वजनात सकारात्मक बदल दिसून येईल.

Best yoga asanas for fat burn weight loss

|

Sakal

वाढता चष्म्याचा नंबर थांबवा! रोज 5 मिनिटांचा ‘आय योगा’ बदलू शकतो तुमची दृष्टी

Eye Yoga Exercises

|

sakal

येथे क्लिक करा