Aarti Badade
सतत मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांचे त्रास जाणवत आहेत. पण 'आय योगा'द्वारे तुम्ही तुमची दृष्टी पुन्हा सुधारू शकता.
Eye Yoga Exercises
sakal
दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात घासून ऊब निर्माण करा. त्यानंतर डोळे मिटून हे ऊबदार तळवे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांच्या नसांना त्वरित आराम मिळतो.
Eye Yoga Exercises
Sakal
स्क्रीनवर काम करताना दर २० मिनिटांनी, २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पहा. हा योगा डोळ्यांच्या स्नायूंवर आलेला ताण (Eye Strain) कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
Eye Yoga Exercises
Sakal
डोके स्थिर ठेवून फक्त डोळ्यांच्या बाहुल्या हलवा. एकदा वर-खाली आणि एकदा डावीकडे-उजवीकडे पाहा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते.
Eye Yoga Exercises
Sakal
डोळ्यांच्या बाहुल्या हळूहळू घड्याळाच्या काट्याप्रमाणे आणि नंतर विरुद्ध दिशेने (Anti-clockwise) गोल फिरवा. असे दोन्ही बाजूंनी ५-५ वेळा करा.
Eye Yoga Exercises
Sakal
स्क्रीनकडे पाहताना आपण डोळे कमी मिटतो, ज्यामुळे डोळे कोरडे पडतात. काम करताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करा, जेणेकरून डोळ्यांमधील ओलावा टिकून राहील.
Eye Yoga Exercises
Sakal
नियमितपणे हे व्यायाम केल्यास डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात. डोळ्यांचा गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
Eye Yoga Exercises
Sakal
Side effects of eating in bed
Sakal