लिव्हर खराब होण्यासाठी ही पदार्थ ठरतात धोकादायक!

Aarti Badade

लिव्हरचे आरोग्य आणि फॅटी लिव्हर

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात फॅटी लिव्हरचे (Fatty Liver) प्रमाण ३८.६% प्रौढांमध्ये आणि ३५.४% मुलांमध्ये वाढत आहे.

Harmful Foods for Liver

|

Sakal

पदार्थ

लिव्हर (यकृत) खराब होण्यास केवळ दारूच नव्हे, तर इतर पाच पदार्थ कारणीभूत आहेत.

Harmful Foods for Liver

|

Sakal

जास्त साखर

मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, ज्यूस आणि कुकीज यांसारख्या जास्त साखर असलेल्या पदार्थांमुळे शरीरात फॅट वाढून ते थेट लिव्हरमध्ये जमा होते.

Harmful Foods for Liver

|

Sakal

तळलेले पदार्थ

बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, पॅक्ड फूड यांसारखे तळकट आणि जास्त फॅट असलेले पदार्थ पचायला कठीण असतात, ज्यामुळे लिव्हरवर ताण येतो आणि सूज वाढते.

Harmful Foods for Liver

|

Sakal

रेड आणि प्रोसेस्ड मीट

रेड मीट, बेकन, सॉसेज यांसारख्या प्रोसेस्ड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असते, ज्यामुळे लिव्हरचे मोठे नुकसान होते.

Harmful Foods for Liver

|

Sakal

जास्त मीठ

कॅन्ड फूड्स, फ्रोजन फूड्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण (Salt/Sodium) जास्त असते. यामुळे शरीरात पाणी साठते आणि लिव्हर कमजोर होते.

Harmful Foods for Liver

|

Sakal

रिफाइंड कार्बोहायड्रेट्स

सफेद भात, पांढरे ब्रेड आणि पेस्ट्री यांसारख्या रिफाईंड कार्बोहायड्रेट्समध्ये फायबर कमी असते. ते रक्तातील साखर वाढवतात आणि लिव्हरमध्ये फॅट जमा करतात.

Harmful Foods for Liver

|

Sakal

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी

संतुलित आहार, नियमित व्यायाम (Regular Exercise) आणि जास्त साखर, मीठ व तळकट पदार्थांपासून दूर राहणे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

Harmful Foods for Liver

|

Sakal

नाकातून रक्त येतंय? उच्च रक्तदाबाचा शांत पण धोकादायक इशारा!

Winter Blood Pressure

|

Sakal

येथे क्लिक करा