शिवराय नसते तर शाळेत इराणची भाषा शिकावी लागली असती

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी महाराज नसते तर…?

आज भारताची राष्ट्रभाषा फारसी असती का? हा विचार करायला लावणारा इतिहास आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवराय भाषेवर ठाम

शिवाजी महाराजांनी आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषेला प्रशासनात महत्त्वाचे स्थान दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

मुघलांचा फारसीवर आग्रह

मुघल, आदिलशाही, निजामशाहीसारखे सत्ताधीश राजकारभार फक्त फारसीतच करत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

फारसीचा परिणाम

फारसी भाषा वापरल्यामुळे सामान्य लोक प्रशासनापासून दूर राहिले. त्यामुळे त्यांच्यात अज्ञान आणि गरिबी वाढली.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवरायांची भाषाविषयक दूरदृष्टी

स्वराज्य स्थापन झाल्यावर शिवाजी महाराजांनी भाषेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यावर भर दिला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

संस्कृत राजमुद्रा, मराठी प्रशासन

शिवरायांनी आपल्या राजमुद्रेसाठी संस्कृत भाषा वापरली. पण राज्याचा कारभार त्यांनी मराठी भाषेत सुरू केला.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

राज्यव्यवहार कोशाची निर्मिती

रघुनाथ पंडित आणि धुंडीराज व्यास यांच्या मदतीने ‘राज्यव्यवहार कोश’ तयार करण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

फारसी शब्दांना संस्कृत पर्याय

या कोशात ‘वजीर’साठी ‘प्रधान’, ‘दिवाण’साठी ‘सचिव’, आणि ‘अमीर’साठी ‘सेनापती’ असे संस्कृत शब्द सुचवले गेले.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

मराठीचा सन्मान वाढवणारे निर्णय

शिवरायांनी पत्रव्यवहार, मेस्तक-लेखन (दस्तावेज लिहिणे) आणि कानुजावतेसाठीही (न्यायालयीन कामांसाठी) मराठीचाच वापर करण्याचा आग्रह धरला.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek | Sakal

शिवराय नसते तर…?

शिवाजी महाराज नसते, तर आजही फारसी किंवा इंग्रजी हीच राष्ट्रभाषा राहिली असती! मराठीचा अभिमान टिकवून ठेवणारा हा प्रेरणादायी इतिहास आहे.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

अमित ठाकरेंनी मराठी ऐवजी निवडली होती 'ही' भाषा

Amit Thackeray | Sakal
येथे क्लिक करा