Aarti Badade
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात, दात दुखतात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, ज्यामुळे तिशीनंतर हाडांचे दुखणे सुरू होते.
Sakal
कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडांची दुखणी, दातदुखीचा त्रास, चक्कर येणे आणि मुंग्या येणे अशी लक्षणे दिसतात, तेव्हा ताबडतोब कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा.
Sakal
दूध, चीज आणि ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात नियमित समावेश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.
Sakal
पालक, मेथी आणि कांदा पात यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमव्यतिरिक्त लोह आणि आवश्यक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.
Sakal
तीळ (Sesame Seeds) आणि चिया सीड्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षाही दुप्पट असल्याने, दररोज सुका मेवा किंवा बियांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
Sakal
राजमा, चणे आणि डाळी यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील कॅल्शियमच्या गरजा पूर्ण होतात.
Sakal
टोफू आणि सोया मिल्क हे उत्तम शाकाहारी कॅल्शियम स्रोत असून, ते दुधाला एक चांगला पर्याय आहेत.
Sakal
हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज तीळ किंवा चिया सीड्स खाण्याचा नियम करा आणि या ५ स्रोतांच्या मदतीने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करा.
Sakal
दुर्लक्ष केलं तर होईल उशीर! शरीर देतंय ब्रेन ट्युमरचे हे गुप्त संकेत!
Sakal