Aarti Badade
ब्रेन ट्युमर (Brain Tumor) हा एक धोकादायक (Dangerous) आजार आहे. यामध्ये मेंदूच्या पेशींमध्ये (Brain Cells) असामान्य वाढ होते. सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
Sakal
डोकेदुखी (Headache) हे ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे सामान्य लक्षण आहे.सतत होणाऱ्या तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.
Sakal
अंधुक दृष्टी (Blurred Vision) किंवा पाहण्यास अडचण येणे हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते.दृष्टीमध्ये कोणताही मोठा बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Sakal
लक्ष केंद्रित न होणे किंवा गोष्टी विसरणे (Memory Loss) हे स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचे लक्षण आहे.हे देखील ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे संकेत असू शकते.
Sakal
हात आणि पायांमध्ये अशक्तपणा (Weakness) जाणवणे.तसेच, त्या भागात मुंग्या येणे (Tingling) किंवा बधिर होणे हे देखील ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते.
Sakal
वारंवार मूड स्विंग (Mood Swings) होणे.तसेच, चिडचिड (Irritability) होणे किंवा स्वभावात बदल जाणवणे, हे देखील एक सामान्य लक्षण आहे.
Sakal
ही लक्षणे दिसल्यास त्यांना साधे समजू नका.त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासणी (Check-up) करून घ्या.
Sakal
Sakal